लग्नाच्या १८ वर्षानंतर उत्तीर्ण केली UPPSCची परीक्षा, तीन मुलांना सांभाळत केली तयारी
एका महिलेने आपल्या तीन मुलांचे संगोपन करताना UPPSC PCS परीक्षेची तयारी तर केलीच, पण तिने या परिक्षेत उत्तीर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ही कथा आहे दीपा भाटी यांची. दीपा भाटी या नोएडातील कोंडली बांगर गावची रहिवासी आहेत. दीपा यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या PCS 2021 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण परीक्षा उत्तीर्ण झाली तोपर्यंत दीपा भाटी यांच्या लग्नाला १८ वर्षे उलटून गेली होती. त्यांना तीन मुलं होती, पण सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.