रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये
Success story of Jayanti Chauhan: टाटा समूहाचे दिवंगत चेअरमेन रतन टाटा हे त्यांच्या दूरदर्शी आणि चतुरस्त्र दृष्टीसाठी ओळखले जातात. यासोबतच त्यांचे परोपकारी व्यक्तिमत्त्वही लोकांना चांगलेच ठाऊक आहे. याच कारणामुळे २०२२ मध्ये जेव्हा भारतातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड मिनरल वॉटर ब्रँड बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांना त्यांचा व्यवसाय विकायचा होता, तेव्हा रतन टाटा यांनी तो विकत घेण्यासाठी हात पुढे केला.