इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केला मोजे विकण्याचा व्यवसाय, कोट्यधीश कपिल गर्ग यांची यशोगाथा
जयपूर येथे राहणारे कपिल गर्ग हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी MNC मध्ये आठ वर्षे काम केलं. त्यानंतर नोकरी सोडून रंगीबेरंगी मोजे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांची पत्नी विधी गर्गने त्यांना पूर्णपणे साथ दिली. त्यांच्या 'ठेला गाडी' कंपनीची वार्षिक उलाढाल आता कोटींवर पोहोचली आहे. कपिल यांनी २०१८ मध्ये फक्त एक लाख रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. चला तर मग, कपिल गर्ग यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.