लग्नाची तयारी करताना सुचली कल्पना, आता करतात कोटींची कमाई; कोणता व्यवसाय करते ही व्यक्ती
मेघा जैन ही जयपूरची रहिवासी आहे. २०१२ मध्ये ती स्वत:च्या लग्नाची तयारी करीत असताना तिला व्यवसायाची एक कल्पना सुचली. पाहुण्यांसाठी भेटवस्तू शोधत असताना तिची नजर महागड्या परदेशी सुपरफूड्सवर पडली. त्यामुळे तिला लोकांना असे आरोग्यदायी पदार्थ देण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने स्वतःची कंपनी ‘केनी डिलाइट्स’ सुरू केली. कोरोना साथीच्या काळात लोकांना निरोगी अन्नाची गरज असल्याने तिच्या व्यवसायाच्या वाढीमध्ये भर पडली. आज मेघा एक यशस्वी उद्योजिका आहे.