बिसलेरीसारख्या कंपन्यांना फुटला घाम! या महिलेने वयाच्या १७व्या वर्षी सांभाळली कंपनी
फ्रुटी, ॲपी आणि बेली पाण्याची बॉटल यांची नावं तुम्ही जरूर ऐकली असतील. तसंच तुम्ही या ड्रिंक्सचे सेवनदेखील केले असेलच. फ्रुटी आणि ॲपी हे आधीच खूप प्रसिद्ध होते, पण गेल्या काही वर्षांपासून बेली वॉटर, बिसलेरी आणि किनलीलाही टक्कर देत आहे. ही प्रसिद्ध उत्पादने प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय नादिया चौहान यांना जाते. तिने हा व्यवसाय सुरू केला नसला तरी त्याला ओळख देण्याचे काम नादियाने केले.