वडिलांचं निधन अन् कर्जाचा डोंगर, तरीही पहिल्याच प्रयत्नात NEET उत्तीर्ण करून मिळवलं यश
एमबीबीएस कोर्स करण्यासाठी घेतलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेला जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परीक्षा कठीण असते; पण अनेक उमेदवारांसाठी, त्यांची परिस्थिती ही स्वतःच एक परीक्षा असते, ज्यामुळे NEET सारख्या परीक्षा त्यांच्यासाठी आणखी कठीण होतात, अशीच प्रेरणाची कहाणी आहे, जिने अनेक अडचणींवर मात करून यश मिळवले आणि ती तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. २०२३ मध्ये प्रेरणाने AIR १०३३ रँकसह NEET मध्ये पात्रता मिळवली. चला तर मग जाणून घेऊ प्रेरणाची कहाणी…