नोकरी सोडली, आईकडून घेतली उधारी; पठ्ठ्यानं इन्स्टाग्रामवरून उभारला १०० कोटींचा ब्रँड
Success story of Rohan Kashyap: रोहन कश्यप हा लुधियानाचा रहिवासी आहे. तो 'बर्गर बे' नावाच्या स्ट्रीटवेअर ब्रँडचा संस्थापक आहे. याची सुरूवात इन्स्टाग्रामवर कपड्यांचे फोटो पोस्ट करण्यापासून झाली. आता ही १०० कोटी रुपयांची कंपनी झाली आहे. शार्क टॅंक इंडिया सीझन ४ मध्ये रोहनला अनुपम मित्तल, कुणाल बहल आणि अमन गुप्ता यांच्याकडून २ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. बर्गर बे त्याच्या अद्वितीय डिझाइन, कमी किमती आणि मजबूत ऑनलाइन कम्युनिटीमुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.