भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे
हरियाणातील नवीन आणि प्रवीण सिंधू या दोन भावांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. दोघेही स्वतःच्या घरी काश्मिरी केशर पिकवतात. त्यासाठी दोन्ही भावांनी इराण आणि इस्रायलचे प्रगत एरोपोनिक्स तंत्रज्ञान वापरले. त्यामध्ये झाडे मातीशिवाय हवेत वाढतात. या तंत्राने त्यांनी घराच्या गच्चीवर काश्मिरी केशर पिकवून लाखो रुपये कमावले आहेत. केशरला जगातील सर्वांत महाग मसाला, असे म्हटले जाते. चला, नवीन आणि प्रवीण सिंधूच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.