बारावीत नापास झाला पण हार मानली नाही! पाहा पठ्ठ्याने कशी सुरू केली अब्जावधीची कंपनी
Success Story of Trishneet arora: अखंड मेहनत आणि जिद्दीने सगळं काही साध्य करता येतं असं म्हणतात. मग कोणतंही अपयश आलं तरी ते आपल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही. अपयश आलं म्हणून हार मानून न जाता पुन्हा हिमतीने उभं राहून तो प्रवास करावा लागतो तेव्हाच यश हाती लागतं. आज आपण अशाच एका हरहुन्नरी तरुणाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बारावीमध्ये नापास होऊनसुद्धा अब्जावधीचा बिझनेस सुरू केला.