मोदी-मस्क यांच्या भेटीनंतर टेस्ला भारतात करणार नोकरभरती, मुंबईतील तरुणांनाही संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर टेस्ला भारतात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. त्यांनी लिंक्डइनवर जाहिरात दिली असून, मुंबई आणि दिल्लीतील तरुणांसाठी कस्टमर सर्व्हिस, बॅकएंड कामे, सेवा तंत्रज्ञ, सल्लागार, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ पदांसाठी संधी आहे. भारताने उच्च दर्जाच्या कारवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे टेस्ला भारतात येण्यास उत्सुक आहे.