ना कॉलेज, ना कोणती पदवी; कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास
तंत्रज्ञानाचा योग्य वापर माहीत असेल तर त्याने तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता असं म्हणतात. आज अनेक तरुण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्राम असो, आज संपूर्ण जग त्यांना ओळखते, ज्यांनी हे अॅप्स विकसित केले. आज आपण आसाममधील दिब्रुगढ या छोट्या शहरातून आलेल्या किशन बागरियाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वत:ला सिद्ध केले.