UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; मुलींनीच मारली बाजी, तर पुणे-ठाण्यातील उमेदवारांचाही समावेश
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शक्ती दुबे पहिल्या, हर्षिता गोयल दुसऱ्या आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. १००९ उमेदवारांची निवड झाली असून यामध्ये ७२५ पुरुष आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे तिसऱ्या, तेजस्वी देशपांडे ९९व्या आणि अंकिता पाटील ३०३व्या क्रमांकावर आहेत.