UPSC परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावलेला अर्चित डोंगरे कोण?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२४ परीक्षेत पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरा रँक मिळवला आहे. अर्चितने व्हीआयटी व्हेल्लोरमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. युपीएससीच्या तयारीसाठी त्याने आयटी नोकरी सोडली. २०२३ मध्ये तो १५३ वा आला होता. यंदा त्याने तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. ठाण्याच्या तेजस्वी देशपांडेने ९९ वा आणि अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे.