वर्ल्ड बँकेत नोकरीची संधी, पण पगार किती, कुठे अन् कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
World Bank Internship 2025 : जर तुम्हीही वर्ल्ड बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी वर्ल्ड बँकेने इंटर्नशिपसाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. या इंटर्नशिप अंतर्गत उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पना अमलात आणण्याच्या विविध गोष्टींमध्ये रिसर्च करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला तासाभराच्या आधारावर पगार मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वेळेचा प्रभावी वापर करण्याबरोबर एक व्यावसायिक अनुभवदेखील मिळेल.