झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, आई-वडिलांचा टाहो!
उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव मोहीम राबवली. या घटनेनंतर रुग्णालयात गर्दी आणि चेंगराचेंगरी झाली.