१२ वर्षांच्या मुलानं ११वीतल्या मित्राची डोक्यात हातोडा घालून केली हत्या; मैत्रिणीसोबतचे…
उत्तर प्रदेशच्या मीरतमध्ये १२ वर्षांच्या मुलाने १६ वर्षांच्या मित्राची हातोड्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलाने आरोपीच्या मैत्रिणीसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडीओ त्याच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये घेतल्यामुळे हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. मृत मुलगा ११वीत शिकत होता आणि आयआयटीची तयारी करत होता.