नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस चौकीच पेटवली!
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत पोलीस चौकी पेटवली. एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोप फेटाळले आहेत. या घटनेमुळे विरोधकांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे. भाजप आणि सीपीआयएम नेत्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.