आता दिल्लीत ‘या’ कागदपत्रावरून ठरणार तुमचं नागरिकत्व!
दिल्लीमध्ये नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार, पॅन किंवा रेशन कार्ड वैध राहणार नाहीत. परदेशी नागरिक असल्याचा संशय असलेल्या लोकांसाठी फक्त मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्टच स्वीकारले जाईल, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धची मोहीम सुरू असून, दिल्लीतील पाकिस्तानी नागरिकांवरही कारवाई तीव्र करण्यात आली आहे.