“रेखा गुप्ता केवळ रबर स्टॅम्प मुख्यमंत्री”, ‘आप’ची टीका; म्हणाले, “ही फुलेरा पंचायत…”
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता यांनी PWD व DUSIB अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या फोटोंमुळे दिल्लीचं राजकारण तापलं आहे. आपचे सौरभ भारद्वाज यांनी रेखा गुप्ता यांना 'रबर स्टॅम्प मुख्यमंत्री' म्हटलं आहे. तर, भाजपाचे वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल सरकारवर पलटवार केला आहे.