“विनोदाच्या नावाखाली…”, कंगना रणौत यांची संतप्त प्रतिक्रिया
विनोदी कलाकार कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांनी समन्स बजावला असून तो चौकशीला हजर राहिला नाही. यावर अभिनेत्री कंगना रणौत यांनी संताप व्यक्त केला आहे. न्यूज १८ शी संवाद साधताना कंगना म्हणाल्या, "माझं अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर त्याची मस्करी केली गेली. ज्या लोकांना स्वतःची इज्जतच सर्व काही आहे, त्यांची चेष्टा करणारे लोक कोण आहेत? ज्यांनी आयुष्यात काहीही केलं नाही."