कन्नड भाषा अनिवार्य न केल्यामुळं नोकर भरतीची जाहिरात कर्नाटक सरकारने मागे घेतली
बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाने ५० लोको ऑपरेटरच्या भरतीसाठी कन्नड भाषेचे ज्ञान आवश्यक नसल्याची जाहिरात दिली होती. कन्नड संघटनांनी यावर आक्षेप घेतल्याने ही भरती रद्द करण्यात आली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बीएमआरसीएलला जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करत स्थानिक उमेदवारांना न्याय देणारी नवी जाहिरात काढण्याचे बीएमआरसीएलने जाहीर केले आहे.