Billionaire and spiritual leader the Aga Khan dies
1 / 30

धर्मगुरु प्रिन्स आगा खान काळाच्या पडद्याआड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरु आगा खान यांचं ८८ व्या वर्षी निधन झालं. लिस्बन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांनी आयुष्यभर केलेल्या समाजसेवेचा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये केला. आगा खान यांचा जन्म १३ डिसेंबर १९३६ रोजी झाला. ते मोहम्मद पैगंबरांचे वंशज मानले जातात. त्यांच्या मागे तीन मुलं, एक मुलगी आणि नातवंडं असं कुटुंब आहे.

Swipe up for next shorts
Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
2 / 30

शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत शहीद व्हायला हवे होते असे वक्तव्य केले होते. यावर राऊत यांनी शिरसाट यांना गद्दार म्हणत प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत आणि प्रयागराजला जाणार आहोत. त्यांनी शिरसाट यांच्या विचारसरणीवर टीका केली आणि राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य हा संघाचा जुना अजेंडा आहे असाही आरोप केला.

Swipe up for next shorts
Aishwarya Rai Bachchan special post for husband abhishek bachchan
3 / 30

ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती अभिषेकसाठी केली खास पोस्ट, कॅप्शन चर्चेत

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभिषेकच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने त्याचा बालपणीचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या. या पोस्टमुळे त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या अफवा थांबल्या. ऐश्वर्या आणि अभिषेक १८ वर्षांपासून एकत्र असून त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे.

Swipe up for next shorts
shirdi sai baba darshan prasad
4 / 30

शिर्डी साईबाबा संस्थानानं भोजन प्रसादाबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; मद्यपान, धूम्रपान…

शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शिर्डी साईबाबा संस्थानने महाप्रसादालयात भोजन प्रसादासाठी कूपन घेणं बंधनकारक केलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं की, धूम्रपान व मद्यपान करणाऱ्यांमुळे त्रास होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. भक्त निवासात नोंदणीच्या वेळी नाश्ता व भोजनाचे कूपन दिले जातील, आणि कोणताही भक्त भोजनाशिवाय राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

Karjat Railway Station
5 / 30

कर्जत रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?

कर्जत येथे मध्य रेल्वेचे काम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन लोकल्सची वाहतूक खोळंबली आहे. एका ओ एच इ वायर खांबाला धक्का लागल्याने अर्धा तास काम थांबले. त्यामुळे चार लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. कर्जतहून सुटणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
6 / 30

‘सनम तेरी कसम’ फेम पाकिस्तानी अभिनेत्रीने केला निकाह, कोण आहे तिचा पती? वाचा…

'सनम तेरी कसम' चित्रपटातून लोकप्रिय झालेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनने अमीर गिलानीसोबत ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केले. मावराने पेस्टल मिंट ब्लू लेहेंगा आणि हिरवे दागिने घालून सुंदर लूक साकारला होता, तर अमीरने ऑलिव्ह हिरवा पठाणी कुर्ता घातला होता. मावराने रोमँटिक फोटो शेअर करत 'and in the middle of chaos… I found you' असे कॅप्शन दिले. चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
7 / 30

पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे

कमी बिया असलेला पपई मिळावा यासाठी वाट बघणारे तुमच्या-आमच्यासारखे सामान्य जन; जर आपल्याला कुणी सांगितलं की, तुम्हाला उलट पपई बियांसह खाल्ल्यावरच फायदा होऊ शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? आम्हालाही खरं वाटलंच नव्हतं. पण, सोशल मीडियावर मात्र पपईच्या बिया खा, असं ओरडून ओरडून सांगणाऱ्यांची गर्दी वाढली होती. अशा वेळी खरं काय ते समोर आणायचं, असं आम्ही ठरवलं आणि तज्ज्ञांकडून याविषयी माहिती घेतली. याच माहितीच्या आधारे आपण आज पपईच्या बियांचं सेवन करावं का? केल्यास त्यानं फायदा होईल की अपाय हे सगळं जाणून घेऊ…

Tirumala Tirupati Temple News
8 / 30

तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवलं, काय आहे यामागचं कारण?

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी किंवा स्वेच्छा निवृत्ती यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. TTD ने संविधानाच्या अनुच्छेद १६ (५) नुसार हा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनात ३०० हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना बदली किंवा निवृत्ती घ्यावी लागणार आहे.

Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
9 / 30

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आणि अजित पवारांची भेट घेऊन प्रश्न लावून धरला आहे. आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन झाले. फडणवीसांनी सुरेश धस यांना आधुनिक भगीरथ म्हणत त्यांचे कौतुक केले. तसंच एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
10 / 30

रणबीर कपूर-आलिया भट्टची लेक झाली फोटोग्राफर! राहाने ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा ( Raha Kapoor ) सध्याची बहुचर्चित स्टारकिड्स आहे. त्यामुळे राहाचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतो. राहा कधी पापाराझींना बाय, बाय करताना, तर कधी फ्लाइंग किस देताना दिसते. दोन वर्षांच्या चिमुकल्या राहाच्या या गोड अंदाजाचा आता मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतंच या चिमुकल्या राहाने एका खास व्यक्तीचा फोटो काढला. याची सध्या चर्चा रंगली आहे. तसंच राहाने काढलेला हा फोटो व्हायरल झाला आहे.

mamata kulkarni News
11 / 30

ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”

अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला होता आणि तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. मात्र, ३१ जानेवारीला तिला आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली. ममता कुलकर्णीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण अपयशी ठरली. तिने बॉलिवूड सोडून अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. 'आप की अदालत'च्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं.

shani gochar 2025 uttarashada nakshatra
12 / 30

२७ वर्षांनंतर शनिचा नक्षत्र बदलाने ‘या’ राशींचे लोक जगतील राजासारखे जीवन

वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनी हा नऊ ग्रहांपैकी सर्वांत शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनीच्या स्थितीतील बदलाने १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. शनी सध्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात स्थित आहे; परंतु २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. शनीच्या या नक्षत्रबदलाने कोणत्या राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊ…

Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
13 / 30

राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे…”

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. त्यांनी महाराजांच्या शिस्तीबद्दल आणि आग्र्याहून सुटण्याबाबत केलेल्या विधानावर टीका झाली. अभिनेता हेमंत ढोमे यांनी सोलापूरकर यांना 'स्वस्तातले इतिहासाचार्य' म्हणत टीका केली. दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी लाच शब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

News About Rapido
14 / 30

“तू खूप सुंदर आहेस, मी तुला…”, रॅपिडो ड्रायव्हरने केला मानसिक छळ, महिलेची पोस्ट व्हायरल

दिल्लीतील एका महिलेने रॅपिडो चालकाने तिला कसा त्रास दिला याचा अनुभव Reddit वर शेअर केला आहे. प्रवासादरम्यान काही त्रास न देता चालकाने तिला इच्छित स्थळी सोडलं, पण नंतर व्हॉट्सअॅपवर कॉल आणि मेसेज करून त्रास दिला. महिलेने रॅपिडोकडे तक्रार केल्यावर, रॅपिडोने चालकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचेही रॅपिडोने सांगितले.

Ketu mangal yuti 2025 today horoscope
15 / 30

जूनमध्ये खुलणार या राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती

केतू हा पापी अन् छाया ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात त्याचा मोठा प्रभाव आहे. केतू एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे सुमारे १८ महिन्यांनंतर राशिबदल करतो. अशा प्रकारे त्याला एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे १८ वर्षांचा कालावधी लागतो. सध्या केतू कन्या राशीत स्थित आहे; परंतु मे महिन्यात तो राशिबदल करून, सिंह राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी ग्रहांचा सेनापती मंगळदेखील जूनमध्ये आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करील. ज्यामुळे अंगारक योग निर्माण होईल.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)
16 / 30

“आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संबंध कसे?

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजपाची युती होणार असल्याची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर उत्तर देताना सांगितले की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात सौहार्दाचे संबंध आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ते जवळ येणार आहेत. महाराष्ट्रात नेत्यांमध्ये संवादाची अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

us president donald trump on Mexican export tariffs
17 / 30

“अमेरिका गाझा ताब्यात घेईल”, ट्रम्प यांचं मोठं विधान; इस्रायलच्या PM समोरच मांडली भूमिका!

गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गाझा पट्टीत चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची वॉशिंग्टनमध्ये बैठक झाली. ट्रम्प यांनी गाझा पट्टीवर अमेरिकेचा ताबा मिळवण्याचा प्रस्ताव मांडला आणि गरज पडल्यास अमेरिकन सैन्य तैनात करण्याची तयारी दर्शवली. नेतन्याहू यांनी या प्रस्तावाला होकार दिला.

rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
18 / 30

शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. त्यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. त्यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली आहे. सोलापूरकर यांनी स्पष्ट केले की, इतिहास रंजक करण्याच्या प्रयत्नात 'लाच' हा शब्द वापरला गेला. त्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे सांगितले.

devendra fadnavis on political extortion
19 / 30

“काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पोलिटिकल एक्स्टॉर्शनवर फडणवीसांचीभूमिका

महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'लोकसत्ता वर्षवेध' अंकाच्या प्रकाशनावेळी विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने उत्तरं दिली. त्यांनी 'मैत्री' पोर्टलच्या सुधारित आवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे उद्योजकांसाठी प्रक्रिया सुलभ होईल. स्थानिक गुंडगिरी आणि राजकीय खंडणीखोरीवर कठोर भूमिका घेत, फडणवीसांनी पोलिसांना पूर्णाधिकार दिले आहेत. सिंगल विंडो व्यवस्थेची हमी देत, उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.

PM Narendra Modi and Rahul Gandhi
20 / 30

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात…”

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. संविधानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "जे लोक खिशात संविधान घेऊन फिरतात त्यांना हे कळणार नाही की मुस्लिम महिलांवर तुम्ही काय वेळ आणली होती. आम्ही ट्रिपल तलाकचा खात्मा केला आणि संविधानानुसार मुस्लिम मुलींना समानतेचा अधिकार दिला. आम्ही संविधानाचा सन्मान करणारे आणि संविधान जगणारे लोक आहोत."

budh uday 2025 today horoscope
21 / 30

बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश

ग्रहांचा राजकुमार बुध हा नऊ ग्रहांमधील खूप खास ग्रह मानला जातो. बुध ग्रह बौद्धिक क्षमता, प्रगती, व्यवसाय, ज्ञान, शिक्षण, वादविवाद इत्यादींचा कारक मानला जातो; यामुळे बुध ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. बुध ग्रहाचा २१ जानेवारी रोजी अस्त झाला. आता २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता बुधाचा कुंभ राशीत उदय होईल. कुंभ राशीत बुध राशीच्या उदयामुळे अनेक राशींना फायदा होईल, पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना भरपूर फायदे मिळू शकतात.

What happens to your body when you don't poop everyday
22 / 30

पोट रोज नीट साफ होत नसेल, तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? वाचा

Bowel movement problems : अनेकांचं रोज पोट नीट साफ होत नाही. अशानं कामात मन लागत नाही आणि मग विविध आजारांचा धोका वाढतो. पोट साफ न होण्याचं मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली अनेकांना हा त्रास जाणवतोय. पण, पोट साफ न होण्यामागे आणखी काही वेगळी कारणं आहेत का? त्यामुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

Success story of kokila who started wooden toy business at the age of 42 know earning lakhs her husband died due to cancer
23 / 30

वयाच्या ४२व्या वर्षी महिलेने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला करतात लाखोंची कमाई

करिअर February 4, 2025

Success story of Kokila: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणींनी भरलेला काळ येतो, परंतु त्या काळातून कसे लढायचे आणि कसे बाहेर पडायचे हे त्या व्यक्तीला माहीत असले पाहिजे. आज आपण एका अशा महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने तिच्या कठीण काळातही हार मानली नाही आणि वयाच्या ४२ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या महिलेचं नाव आहे कोकिला.

PM Narendra Modi Speech
24 / 30

नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशा एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, ते..”

आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले त्यांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं. त्यांनीच हे म्हटलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक रुपया निघतो तेव्हा गावांमध्ये १५ पैसे पोहचतात. त्या कालावधीत तर पंचायत ते पार्लमेंट एकाच पक्षाचं राज्य होतं. त्यावेळी त्याच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं. अत्यंत खुबीने केलेली ती हातसफाई होती. असं म्हणत राजीव गांधींचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला.

AnJali Damania on Dhananjay Munde
25 / 30

“दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार उघड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले. मुंडे यांनी दमानिया यांच्यावर सनसनाटी निर्माण करण्याचा आरोप केला. प्रत्युत्तरादाखल दमानिया यांनी पुरावे सादर केले आणि मुंडे यांच्यावर टीका केली. त्यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करत मुंडे यांचा राजीनामा मागितला.

World Cancer Day Lung Cancer Cases In Never-Smokers On The Rise Lancet Study
26 / 30

कधीही सिगारेट न ओढणाऱ्यांमध्ये वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण; संशोधनाचा निष्कर्ष

कधीही धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि वायुप्रदूषण या वाढीस कारणीभूत ठरू शकते, असा धक्कादायक खुलासा एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त 'द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल'मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला

CIDCO HOMES APPLICATION LAST DATE (1)
27 / 30

घरं २६ हजार, अर्ज २२ हजार; कुणाला कुठे घर मिळणार? ‘या’ तारखेला अंतिम यादी येणार!

मुंबई February 4, 2025

सिडकोने नवी मुंबईत २६,५०२ घरांची घोषणा केली होती, परंतु गरीब आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं महाग ठरली. अर्ज भरण्याची मुदतवाढ देऊनही फक्त २२,००० अर्ज आले. घरांच्या किमती २५ लाख ते ९७ लाख होत्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नव्हत्या. सिडकोने अर्जदारांची मसुदा यादी जाहीर केली असून, अंतिम यादी १० फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

What Rahul Solapurkar Said?
28 / 30

“राहुल सोलापूरकरांच्या विधानामागे कुणाचा सडका मेंदू?” रोहित पवारांचा सवाल

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर न करता, लाच देऊन सुटका केली असा दावा केला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावर टीका करत, अशा वादग्रस्त विधानांमागील हेतू शोधण्याची गरज व्यक्त केली आहे.

middle class family
29 / 30

“६० लाख उत्पन्न असलेलाही गरीबच”, सोशल मीडियावर वाद; तुमचं मत काय?

एका नेटकऱ्याने मांडलेल्या आर्थिक वर्गीकरणानुसार, मध्यमवर्गीयांची व्याख्या बदलली आहे. त्यानुसार, ६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला प्रत्येक व्यक्ती गरीब आहे. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. काहींनी ६० लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब म्हटल्याबद्दल खिल्ली उडवली, तर काहींनी पिढीजात संपत्तीबाबतच्या वक्तव्याचे समर्थन केले.

Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
30 / 30

खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आणि नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.