अफझल गुरूच्या फाशीबाबत ओमर अब्दुल्ला यांचे धक्कादायक विधान; म्हणाले…
२००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल गुरूच्या फाशीबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अफझल गुरूला फाशी देऊन काहीच साध्य झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर सरकारचा या फाशीशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे.