मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक; म्हणाले, “काही लोक…” -Video
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. २०११ साली मनमोहन सिंग सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारे यांनी आंदोलन छेडले होते. अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करताना त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था बदलली आणि त्यांच्या आठवणी कायम राहतील, असे हजारे म्हणाले.