केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘हे’ नेते आघाडीवर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटल्यावर दोन दिवसांत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीतून गोपाल राय, आतिशी मार्लेना, सौरभ भरद्वाज, कैलाश गहलोत, इम्रान हुसैन आणि सुनीता केजरीवाल यांच्या नावांची चर्चा आहे. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सहा नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतील.