अरविंद केजरीवाल आता राज्यसभेत जाणार? भाजपाकडून शंका व्यक्त करताच ‘आप’नं केलं स्पष्ट
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाचे अमित मालवीय आणि जयवीर शेरगील यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे.