“मोफत जेवण आणि राहण्याची मागणी करून…”, इन्फ्लुअन्सर्सना पर्यटन मंत्र्यांचं चोख उत्तर!
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मिडिया इन्फ्ल्युअन्सर्सवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. खौंटे म्हणाले की, गोव्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार काम करत आहे. त्यांनी गोव्याची थायलंडशी तुलना न करण्याचे आवाहन केले आणि राज्याची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. गोव्यातील हॉटेल्सची बुकींग चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले.