असदुद्दीन ओवैसींना गृहमंत्री अमित शहांचा फोन, सर्वपक्षीय बैठकीचं दिलं आमंत्रण!
AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वपक्षीय बैठकीत ५ ते १० खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओवैसींना फोन करून बैठकीला आमंत्रित केले. ओवैसींनी तत्काळ दिल्लीला जाण्याची तयारी केली आणि सर्वपक्षीय बैठकीत आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले.