‘पहलगाम हल्ल्यामागे सरकारचा हात’, वादग्रस्त विधानानंतर आमदार अमिनूल इस्लाम यांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आसाममधील AIUDF पक्षाचे आमदार अमिनूल इस्लाम यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारचा हात असल्याचा आरोप केला. या विधानानंतर आसाम पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.