‘पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या’, संसदीय समितीची शिफारस, पुरस्कार वापसीवर…
देशातील राजकीय मुद्द्यांवर निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवर पुरस्कार परत करतात. संसदीय समितीनं अशा कृतीमुळे पुरस्काराचा मान राखला जात नाही, म्हणून पुरस्कार परत न करण्याची लेखी हमी आधीच घेण्याची शिफारस केली आहे. समिती अध्यक्ष संजय झा यांनी प्रतिज्ञापत्रावर सही घेण्याचा पर्याय सुचवला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने यावर पावलं उचलावी, असंही समितीनं नमूद केलं आहे.