Video: ‘नमाजच्या 5 मिनीट आधी पूजेसाठीचे स्पीकर बंद करा’, बांग्लादेश सरकारचे निर्देश
बांगलादेश गृहमंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी दुर्गा पूजेसाठी वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर नमाज व अजानच्या पाच मिनिटे आधी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी संबंधित हिंदू संघटनांशी चर्चेनंतर निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. तसेच दुर्गा पूजा उत्सवाच्या काळात २४ तास सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.