“…तर मी नक्की मरेन”, सुप्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांचं धक्कादायक विधान; म्हणाल्या…
अवघ्या महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि मोहम्मद युनूस हंगामी पंतप्रधान झाले. या पार्श्वभूमीवर भारतात राहणाऱ्या बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांच्या वास्तव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांचा परवाना नूतनीकरण न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. तसलिमा नसरीन यांनी बांगलादेशच्या राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.