वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
उत्तर प्रदेशच्या भोपाळमध्ये एका मुलाने आपल्या ८० वर्षांच्या आजारी आईला घरात बंद करून फिरायला गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ललिता दुबे या वृद्धापकाळामुळे अंथरुणाला खिळलेल्या होत्या. मुलगा अरुण उज्जैनला जाताना घराला कुलूप लावून गेला. अजयने मित्राच्या मदतीने आईची चौकशी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे समजले. शवविच्छेदन अहवालात अतीउपासमार आणि तहान यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अरुणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.