“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका
मंगळवारी इराणने इस्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी इस्रायलला इशारा दिला की, इस्रायलने तेहरानच्या राष्ट्रीय संपत्तीवर हल्ले थांबवले नाहीत तर इराण पुन्हा हल्ला करेल. हेझबोलाच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर इराणने बदला घेण्याची शपथ घेतली होती. राजदूतांनी नेतान्याहू यांना २१ व्या शतकातील हिटलर असे संबोधले.