दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या शगून परिहार विजयी!
जम्मू काश्मीरमधील किश्तवार भाग कधीकाळी दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली होता. येथे सातत्याने दहशतवादी कारवाया सुरू होत्या. याच मतदारसंघातून भाजपाच्या शगून परिहार यांचा विजय झाला आहे. त्यांच्या वडिलांचा २०१८ साली दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. भाजपाने २०१७ मध्ये कलम ३७० रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शगून परिहार यांच्या प्रचारासाठी किश्तवारला भेट दिली होती. शगून परिहार यांची निवड दहशतवाद संपवण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांचे प्रतीक मानली जाते.