“तुम्ही मुस्लीम आयुक्त…”, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा माजी निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर देशातील यादवी युद्धासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्यावर टीका करत, "तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हे तर मुस्लीम आयुक्त होता," असे म्हटले. कुरैशी यांनी वक्फ सुधारणा कायद्याचा निषेध नोंदवला होता, ज्यावरून दुबे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टीने दुबेंच्या वक्तव्यापासून अंतर राखले आहे.