महाराष्ट्रात NHAI चं २०३ कोटींचं नुकसान; CAG चा अहवाल लोकसभेत सादर, रस्ते कंत्राटदारांना..
१६ डिसेंबर रोजी लोकसभेत सादर झालेल्या कॅग अहवालानुसार, महाराष्ट्रातील रस्ते बांधकामातील दिरंगाईमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे २०३ कोटींचे नुकसान झाले आहे. नांदेड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांकडून अपेक्षेपेक्षा कमी नुकसान भरपाई वसूल झाल्याचे नमूद केले आहे. एनएचएआयने केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.