शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार
३५ वर्षीय मोहम्मद सादिक खत्रीला १६ वर्षीय मुलीवर पाच तासांत तीन वेळा बलात्कार केल्याप्रकरणी नवसारी विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खत्रीने मुलीला मुंबईला पोहोचवण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. अटक केल्यावर त्याच्याकडे लैंगिक वर्धक गोळ्या सापडल्या. न्यायालयाने खत्रीच्या विकृत मानसिकतेवर आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर कठोर शब्दांत टिप्पणी केली.