कॅनडात पुन्हा मार्क कार्नी सरकार; भारताशी संबंध सुधारण्याचे संकेत
सोमवारी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालं आणि मंगळवारी मतमोजणी झाली. लिबरल पक्षाचे मार्क कार्नी पुन्हा सत्तेत आले, तर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पिएर्रे पॉलिव्हरे पराभूत झाले. १७ पंजाबी व्यक्ती निवडून आल्या. खलिस्तानी समर्थक जगमीत सिंह पराभूत झाले. मार्क कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर टीका केली आणि कॅनडाच्या नागरिकांना एकतेचं आवाहन केलं.