“शिवरायांचा पुतळा कोसळणं ही सर्व भारतीयांसाठी…”, अखिलेश यादवांचा संताप; केली मोठी मागणी
भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. या घटनेवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.