फक्त सहा महिन्यांसाठी संजीव खन्ना सरन्यायाधीश, पुन्हा नव्या न्यायमूर्तींची होणार नियुक्ती!
भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. चंद्रचूड यांनी दोन वर्षे सेवा दिली, तर खन्ना यांना फक्त सहा महिने मिळणार आहेत. खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला आणि त्यांनी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती मिळवली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत.