राम मंदिराचे मुख्य पूजारी मंहत सत्येंद्र दास यांचे निधन
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. स्ट्रोकमुळे त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. सत्येंद्र दास १९९२ पासून राम मंदिरात पुजारी होते आणि त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी आध्यात्मिक प्रवास सुरू केला होता.