चीनचा पाकिस्तानशी ‘अवकाश सलोखा’, PRSC-EO1 चं यशस्वी प्रक्षेपण!
चीनने पाकिस्तानचा PRSC-EO1 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला आहे. जियूक्वॅन सॅटेलाईट लाँच सेंटरवरून लाँग मार्च टू डी कॅरियरच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. चीनने यापूर्वीही पाकिस्तानचे अनेक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील अवकाशविषयक सहकार्य वृद्धिंगत होत आहे. या प्रक्षेपणामुळे भारतासाठी सुरक्षा आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.