Video: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांना दिला राष्ट्रध्वज!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गौतम अदाणींच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. विरोधकांनी संसदेबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत, तिरंगा आणि गुलाबाचं फूल सत्ताधारी आमदारांना दिलं. राहुल गांधींनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तिरंगा देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अदाणींच्या वर्चस्वावर टीका केली. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानावरूनही वादंग निर्माण झाला.