माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. येचुरी यांनी वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनं केली. १९७४ साली एसएफआयमध्ये प्रवेश करून १९८४ साली माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. २०१५ साली ते माकपचे महासचिव झाले आणि १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं.