‘मोहम्मद शमीनंही महाकुंभमध्ये स्नान केलं’, योगींच्या दाव्यावर अखिलेश यादव यांचा टोला
महाकुंभमेळ्यात अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकारणी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत क्रिकेटपटू मोहम्मद शमीने महाकुंभदरम्यान स्नान केल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी योगींना टोला लगावत, क्रिकेटपटूचे नावही बदलले का, असा सवाल केला.