१९ वर्षांच्या तरुणीवर २३ जणांकडून सहा दिवस सामूहिक बलात्कार, कुठे घडली घटना?
वाराणसीत १९ वर्षीय मुलीवर २३ जणांनी सहा दिवस सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबाने ६ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी १२ आरोपींची ओळख पटवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.