हॉटेलच्या छतावर महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक, कुठे घडली घटना?
बंगळुरुच्या कोरमंगला भागात एका महिलेवर चार जणांनी हॉटेलच्या छतावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चार आरोपींपैकी एक तिचा मित्र होता, ज्याने तिला हॉटेलमध्ये बोलावले होते. बलात्कारानंतर तिच्याकडचे पैसे लुटून तिला हाकलून दिले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. पीडित महिला दिल्लीची आहे.