म्यानमारला जाणाऱ्या भारतीय विमानावर सायबर हल्ला, पायलटची समयसूचकता अन् मोठा अनर्थ टळला
म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अशा वेळी उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला भारताने मदत पाठवण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. दरम्यान, मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सी-१३० विमानावर सायबर हल्ला झाला. जीपीएस स्पूफिंगमुळे नेव्हिगेशन प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु वैमानिकाने अंतर्गत प्रणालीवर स्विच करून विमान सुरक्षित उतरवले आणि मदत सामग्री म्यानमार प्रशासनाच्या ताब्यात दिली.