दाऊदी बोहरा समाजाकडून मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध, दुष्परिणाम रोखण्यासाठी पाऊल!
मोबाईलच्या अतीवापरामुळे लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण आणण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाने १५ वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घातले आहेत. पुणे मिररच्या वृत्तानुसार, समाजाकडून जागतिक स्तरावर जनजागृतीसाठी कार्यशाळा आणि सेमिनार्स आयोजित केल्या जात आहेत. मुलांना वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.